मुंबई – बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यांचा या ट्विटला हजारो युजर्स तसेच सर्व सामान्य चाहत्यांंपासून ते नेते मंडळी, कलाकार, क्रिकेटपटूंनीही ट्विट करत प्रार्थना केले आहेत.
T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. family and staff undergone tests , results awaited ..
All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested !— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 11, 2020
यात गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही ट्विट करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. सोबतच ते लवकर बरे होतील, असा विश्वासही दाखविला आहे.
“नमस्कार अमितजी. तुमच्यावर आणि अभिषेकवर देवाचा आशीर्वाद आहे. तुम्ही लवकरच बरे होऊन घरी याल याची मला खात्री आहे”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.