#INDvENG : इंग्लंड संघ तीन दिवस विलगीकरणात

नवी दिल्ली – भारताविरुद्धच्या मालिकेसाठी येत्या बुधवारी दाखल होत असलेला इंग्लंडच्या संघाला तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंकेत मालिका खेळत असून भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नई येथे येत्या 5 फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटीने प्रारंभ होत आहे. इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाल्यावर चेन्नईतच त्यांना तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-20 तसेच एकदिवसीय मालिका खेळणार आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने या मालिकेतील सामने केवळ या तीनच शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. पुण्यात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने होणार असून टी-20 सामन्यांची मालिका अहमदाबादमध्येच होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.