Check PF Balance – कामगार मंत्रालयाने अर्थमंत्र्यांची सहमती मिळाल्यानंतर सहा करोड पेक्षा अधिक कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वर 2019 – 20 साठी 8.5 टक्के व्याजदर अधिसूचित केला आहे. अर्थ मंत्रालयाची सहमती मिळाल्यानंतर कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी ईपीएफवरील व्याज दराच्या अधिसूचनेस औपचारिक मान्यता दिली. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याचे देखील अर्थमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले आहे.
ग्राहकांच्या खात्यात व्याज रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पुढील पद्धतीने जाणून घेऊ शकता…
SMS च्या माध्यमातून जाणून घ्या –
– जर तुमचा यूएएन नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असेल तर तुमच्या पीएफच्या शिल्लक रकमेची एसएमएसवरून माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर EPFOHO लिहून पाठवावे लागेल. मेसेज पाठवताच काही वेळेत तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रकमेची माहिती संदेशाद्वारे प्राप्त होईल.
– जर तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN लिहून पाठवावे लागेल. पीएफ शिल्लक जाणून घेण्याची ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे. पीएफ बॅलन्ससाठी आपले यूएएन बँक खाते, पॅन आणि आधार (आधार) शी जोडलेले असणे आवश्यक आहे.
मिस कॉलद्वारे शिल्लक जाणून घ्या –
011-22901406 याक्रमांकावर आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एक मिस कॉल द्या. यानंतर EPFO च्या मेसेजवरून PF ची माहिती मिळेल. येथेही तुमचा यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.
या प्रकारे ऑनलाइन तपासता येते पीएफ रक्कम –
– ईपीएफओ वेबसाइटवर लॉग इन करा. epfindia.gov.in संकेतस्थळाला भेट देऊन तेथे ई-पासबुकवर क्लिक करा.
– ई-पासबुकवर क्लिक केल्यावर तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर जाल.
– त्यानंतर तुम्हाला तुमचे यूजर नेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल.
– त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल तेथे तुम्हाला मेंबर आयडी निवडावा लागेल.
– त्यानंतर तुम्हाला तुमच्या ई-पासबुकवर ईपीएफची शिल्लक दिसेल.
त्याचबरोबर तुम्ही उमंग अॅपद्वारेही तुमची पीएफ शिल्लक रक्कम तपासू शकता..