पारनेर -एकीकडे करोना काळात हजारो रुग्णांना शरदचंद्र पवार महाकोविड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार जीवनदान दिले आहे. देशासह महाराष्ट्र राज्यात करोना काळात उल्लेखनीय काम केले असतानाही केवळ एका भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी राज्यातील नेते जर पारनेरमध्ये येत असतील तर भाजपच्या नेत्यांनी सुपारी घेतल्या असल्याचा गंभीर आरोप शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी केला आहे.
एकीकडे राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्या प्रश्नावर आवाज उठवणे अपेक्षित असून, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांना समर्थन देऊन एक प्रकारे पाठीशी घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.शिवप्रहार संघटनेचे संस्थापक भोर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात आंदोलन करणारा महसूल कर्मचारी,तलाठी संघटनेचे सदस्य यांना आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
शिवप्रहार संघटनेच्या वतीने संजीव भोर यांनी भ्रष्ट व मनमानी कारभार करणाऱ्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरेंवर निलंबनाची,तसेच सरकारी सेवा शर्ती भंग केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकऱ्यांकडे केली आहे.आत्महत्या करण्याचा इशारा देणारा ज्योती देवरेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शेतकरी नेते अनिल देठे, संपत दरेकर, नीलेश भोर, सतीश भोर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांनी सुपारी घेऊन केली तहसीलदार ज्योती देवरे यांची पाठराखण शिव प्रहार संघटनेचे संजीव भोर यांचा घणाघाती आरोप करण्यात आहे.
भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांनी सुपारी घेऊन केली तहसीलदार ज्योती देवरे यांची पाठराखण शिव प्रहार संघटनेचे संजीव भोर यांचा घणाघाती आरोप या निवेदनात केला आहे.भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी देवरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र चित्रा वाघ यांनी सुपारी घेऊन ही भेट घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी केला आहे.