पुणे : करोनाचा संशयित कॅब चालक हा दोन दिवसापुर्वी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयात काही कामानिमित्त गेला होता.
कॅब चालकाशी संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज तपासणीसाठी नेण्यात आले होते. सकाळी अचानक त्यांना तपासणीसाठी नेण्यात आल्याने आरटीओ मध्ये मात्र घबराट पसरली होती.
मात्र या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना दुपारनंतर सोडून देण्यात आले आहे. पुण्यात करोना संशयित रूग्ण आढळले आहेत.
त्यात एका कॅब चालकाचा ही समावेश आहे. या कॅब चालकाला काल संध्याकाळपासून नायडू रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार तो दोन दिवसापुर्वी आरटीओ कार्यालयात कामानिमित्त गेला होता.
कार्यालयात ज्या कर्मचाऱ्यांना तो भेटला त्यांना आज सकाळी तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. या तीन कर्मचाऱ्यांची नायडू रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये करोनाची कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी पुन्हा कामावर आल्याने सकाळी आरटीओ कार्यालयात असणारे घबराटीचे वातावरण दुपारनंतर निवळले.