Corona – जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona )अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
ताज्या आकडेवारीमुळे देशात मागील 24 तासांत करोनाची लागण झालेल्यांची संख्या 798 असून, 28 डिसेंबरपर्यंत JN-1 व्हेरियंटची 145 रुग्णांना बाधा झाली आहे. तर, 5 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण सक्रिय रूग्णसंख्या 4.091 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (दि.29) दिली आहे.
A total of 145 cases of JN.1 variant have been reported till 28th December, these samples were collected between 21 November and 18th December 2023: Official Sources
— ANI (@ANI) December 29, 2023
तसेच, केरळमधील 2, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत करोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5.33.351वर पोहोचली आहे.
एकूण प्रकरणांपैकी केरळमधील 41, गुजरातमधील 36, कर्नाटकातील 34, गोव्यातील 14, महाराष्ट्रातील 9, राजस्थानमधील 4, तामिळनाडूतील 4, तेलंगणातील 2 आणि दिल्लीतील 1 रुग्ण आढळून आला आहे.
तर 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत आतापर्यंत कोविडच्या JN-1 उपप्रकारची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केलं आहे.