आग विझवण्यासाठी तरुणाईचे प्रयत्न
कोल्हापूर : कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यात बुधवारी वनवा पेटला. अभयारण्यात लागलेल्या आगीमुळे शेकडो एकर परिसरातील जैवविविधतेची हानी झाली आहे.
आगीचा इतकी भीषण होता की,शेकडो एकर परिसरातील वनसंपदा जळून बेचिराख झाली आहे. कोल्हापूर काळम्मावाडी मार्गावर गैबी वन तपासणी नाक्यापासून अवघ्या कांहीं अंतरावर ही आग लागली आहे.
आग लागल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या कांहीं नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, नागरिकांना आग आटोक्यात आणता आली नाही.
विशेष म्हणजे या भागात वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आढळतात. आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही तर वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.
विभागातील वनवे विझवा आणि वनसंपदा वाचवा असे वन विभागाकडून आव्हान केले जाते. मात्र, प्रत्यक्षात आग लागल्यानंतर वन विभाग कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही.