जगभरात असे काही प्रसिद्ध चित्रकार आहेत, ज्यांच्या चित्रांची लाखो आणि कोटींमध्ये विक्री होते. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना बराच वेळ लागतो. मात्र, जर तुम्हाला कोणी सांगितले कि एक वराह किंवा डुक्कर चक्क पेंटिंग करून लाखो- करोडो कमावतो, तर तुम्ही यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही ! तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, स्वतः पेंटिंग करणारे हे डुक्कर रातोरात श्रीमंत झाले आहे. या प्राण्यांमधील ‘पिगकासो’ च्या पेंटिंगने लोकांना वेड लावले आहे. त्याने बनवलेल्या पेंटिंगची किंमत इतकी आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. चला तर जाणून घेऊया, हा नक्की काय प्रकार आहे!
याआधी तुम्ही क्वचितच कोणत्याही प्राण्याला पेंटिंग बनवताना पाहिलं असेल. त्यामुळे डुक्कर पेंटिंग करताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. एवढेच नाही तर या डुकराने बनवलेले पेंटिंग लाखो रुपयांना विकले जात आहे.
* जगभरात लोकप्रिय झालाय पिगकासो !
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या डुकराचा पेंटिंग बनवण्याचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. पिगकासो नावाचे हे डुक्कर त्याच्या पेंटिंगमुळे जगभरात लोकप्रिय झाले आहे.
* कलात्मकतेमुळे सर्वांचे आवडते डुक्कर
नेहमी घाणीत आणि चिखलात लोळत असल्यामुळे या घृणास्पद दिसणार्या डुक्कराचा लोक तिरस्कार करतात, पण पिगकासो हे डुक्कर आपल्या कलात्मकतेमुळे लोकांचे आवडते बनले आहे.
* कुठे राहतो पिगकासो ?
पिगकासो नावाचा चित्रकार डुक्कर दक्षिण आफ्रिकेचा आहे आणि जोआन लेफसनने त्याचे संगोपन केले आहे, असे डेली स्टारने वृत्त दिले आहे. 50 वर्षीय जोआनला हे डुक्कर 2016 मध्ये मिळाले होते, जेव्हा हे डुक्कर संकटात सापडले होते. जोसेने त्याला केवळ स्लॉटर हाऊसमधून सोडवले नाही तर त्याला आपल्यासोबत घरी आणले.
* पिगकासोने पेंटिंगची सुरुवात कशी केली?
जोआनने एकदा त्याच्या डुकराला पेंटिंग ब्रशने खेळताना पाहिले. या डुकराच्या पेनमध्ये चुकून ब्रश राहिला होता. डुक्कर ब्रशने खेळताना पाहून मालकाला वाटले की कदाचित याला चित्रकलेची आवड आहे. त्यानंतर त्याने त्याच्यासाठी कॅनव्हास आणला आणि त्याच्यासमोर पेंट आणि ब्रश ठेवला.
* तोंडाने ब्रश धरून कॅनव्हासवर कलाकृती करतो
यानंतर, या डुकराने ब्रश तोंडाने धरून कॅनव्हासवर उभ्या आडव्या डिझाइन्स बनवण्यास सुरुवात केली. त्याने काढलेल्या आडव्या-तिडव्या रेषांचे अजब पेंटिंग सर्वांनाच आवडू लागले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. विशेष म्हणजे पेंटिंग झाल्यावर शेवटी तो त्याचे नाक रंगात बुडवून स्वतःचा ऑटोग्राफही पेंटिंगच्या खाली देतो.
* पहिल्या पेंटिंगची किंमत ऐकून धक्का बसेल !
त्यानंतर मालकाने पिगकासोने बनवलेले पेंटिंग सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. डुकराने केलेल्या पेंटिंगबद्दल ऐकून लोक ते पाहण्यासाठी येऊ लागले आणि पहिले पेंटिंग 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकले गेले. आतापर्यंत 10 कोटींच्या पेंटिंगची विक्री झाली आहे.
जोआन म्हणते की त्याने सोशल मीडियावर शेअर करताच पिग्कासोची पेंटिंग्ज विकत घेणारे लोक मिळू लागले. या चित्रकार डुकराने बनवलेल्या 4000 चित्रांची आतापर्यंत विक्री झाली आहे. त्याची एकूण किंमत 10 कोटींहून अधिक होती !