मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

दिल्ली– देशाचे १५वे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये पंतप्रधानपदाची शपथग्रहण केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथग्रहण केल्यानंतर त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या नव्या शिलेदारांनी देखील केंद्रीय मंत्रिपदाची शपथग्रहण केली आहे. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील अनेक दिग्ग्ज नेत्यांचा समावेश करण्यात आले आहे. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर,पियुष गोयल, अरविंद सावंत, रावसाहेब दानवे,रामदास आठवले आणि संजय धोत्रे या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

पहिल्या मोदी सरकारमध्येही महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अनंत गीते, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरे, रावसाहेब दानवे, हंसराज अहीर, रामदास आठवले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×