‘संस्कृती’ची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई- साधी आणि सर्वांना आपलीशी वाटावी अशी कहाणी असलेली ‘गावाकडच्या गोष्टी’ या वेबसीरिजचे दोन यशस्वी पर्व झाले आहेत. गावापासून शहरापर्यंत सर्वत्र या वेबसिरीजची चांगलीच हवा झाली आहे. मात्र, या वेब सीरिजने एक वेगळे वळण घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. गावाकडच्या गोष्टीमधील लोकाप्रिय जोडी ‘संत्या-सुरकी’ यांची प्रेमकथा आता, नितीन पवार दिग्दर्शित ‘संतुर्की’ या वेब सिनेमाद्वारे पाहता येणार आहे. साधी आणि सर्वांना आपलीशी वाटावी अशी संत्या आणि सुरकीची कहाणी आहे. नुकताच या वेब सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘संतुर्की’ वेब सिनेमामध्ये संतोष राजे महाडिक, रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर के.टी.पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलीकर, समाधान पिंपळें हे कलाकार देखील सिनेमात असणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)