Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना महाराष्ट्रातील जागावाटप अद्यापही रखडले आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्याव्यात, यावरून रखडली आहे.
तर महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाला किती जागा सोडाव्यात, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कालपासून बैठका घेतल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. या दोन्ही बैठकांमधून अद्याप तरी जागावाटपाबाबत ठोस निर्णय झाल्याचे दिसून येत नाही.