…म्हणून मुख्यमंत्र्यांंना मराठा आरक्षणाचं श्रेय नाही

नवी दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरवला आहे. कोणत्याही समाजाच्या ताटातील काहीही काढून न घेता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकारने दिले आहे. याबाबत भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी सवांद साधतात म्हटले आहे की,’मुख्यमंत्र्यांंना एकट्याला मी मराठा आरक्षणाचं श्रेय देत नाही. आरक्षण मिळालं तर कोर्टाची जमेची बाजू आणि आरक्षण नाही मिळालं तर सरकारची जबाबदारी, असं नसतं. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यात भाजप सरकारचा मोठा वाटा आहे पण याचं संपूर्ण श्रेय मराठा समाजाला देत आहे. मराठा समाजाने आंदोलने शांततेत कशी करावीत याचा आदर्श जगाला दाखवून दिला आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ हे वाक्य त्यांनी केवळ म्हटलं नाही तर ते जगलं. त्यांना मी शुभेच्छा देते, असेही मुंडे यांनी म्हटलं आहे.

आरक्षण मिळालं तर कोर्टाची जमेची बाजू आणि आरक्षण नाही मिळालं तर सरकारची जबाबदारी, असं नसतं. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यात भाजप सरकारचा मोठा वाटा असल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.