पुणे – प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून एकच गोंधळ निर्माण झाला आहे. भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी देखील इंदुरीकरांवर खोचक टीका केली होती. मात्र, त्यांना मोठा विरोध सहन करावा लागत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले असून, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या कि, “श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेचा आजचा पोशाख… परस्त्रीला मातेसमान मानणारा वारकरी संप्रदाय खूप छान आहे, मलाही मनापासून आवडतो… महाराष्ट्रात अनेक कीर्तनकार आहेत. महिला आणि पुरुष कीर्तनकार जे चांगले प्रबोधन करीत आहेत, त्या सर्वांना आमचा पाठिंबा आहे. परंतु महिलांचा वारंवार अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे मग ते कोणीही असू दे… विठूमाऊली हा खरा संघर्ष करायला मला तुम्हीच ताकद देत आहात. रामकृष्णहरी(माऊलींचा फोटो आहे त्यामुळे इंदुरीकर समर्थकांनी माऊलींचा मान ठेवून कमेंट लिहाव्यात)