फ्रान्सने वापरला नकाराधिकार
संयुक्त राष्ट्र/ नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये काश्मीरवरील चर्चा करण्याचा प्रस्ताव फ्रान्सने वापरलेल्या नकाराधिकारामुळे फेटाळला गेला आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत चर्चा करण्याचा हा प्रस्ताव चीनने दिला होता. मात्र आता या विषयावर चर्चा होणार नाही.
सुरक्षा परिषदेच्या आजच्या बैठकीमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रस्ताव होता. सुरक्षा परिषदेच्या सल्लामसलत कक्षातील चर्चेमध्ये अन्य प्रकरणांबरोबरच दुपारीच या मुद्दयावर चर्चा होणार होती. मात्र नियोजनाप्रमाणे या मुद्दयावर चर्चा झाली नाही, असे फ्रान्सच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूत्रांनी सांगितले.
आमचे म्हणणे अगदी स्पष्ट आहे. काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा होणे आवश्यक आहे. आम्ही नुकतेच संयुक्त राष्ट्रासह अनेक वेळा या मुद्दयावर प्रकाश टाकण्यात आला आहे, असे एका सूत्राने सांगितले.
ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधील 370 वे कलम रद्द केल्यापासून सुरक्षा परिषदेच्या बंद कक्षात काश्मीरबाबत चर्चा व्हावी, अशी औपचारिक सूचना चीनने केली होती. त्यासाठी परिषदेचे अध्यक्षपद असलेल्या पोलंडला पाकिस्तानने ऑगस्ट महिन्यात पत्रही लिहीले होते.