नवीदिल्ली – भारतीय जवानांविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आणि अभिमान आहे. जवान प्रत्येक भारतीयांच्या सरंक्षणासाठी आपल्या सीमेवर ऊन वारा पाऊस झेलत उभे असतात. वातावरण,हवामान कसे आहे याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. ते नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्परतेने काम करताना दिसतात. अशाच कामातून थोडा वेळ काढून जवानांनी डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
काश्मीरच्या मायनस वातावरणात जवानांनी थोडा विरंगुळा म्हणून केलेल्या डान्स लक्षवेधी ठरतोय. बर्फावर अगदी एखाद्या प्रोफेशनल डान्सरलाही लाजवेल असे कर्तब दाखवत जवानांनी डान्स केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येतंय. ‘काला चष्मा’ या हिंदी गाण्यावर यावेळी जवानांनी नाचत मनसोक्त आनंद घेतल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
Here comes #Saviours of Valley,Best way to make you smile,Thanx Guys for super video from #Macchel sector of @ChinarcorpsIA. #Warriors of #IndianArmy giving competition on trending #KalaChashma. Let’s Rock the way @SidMalhotra & #Katrina. @AmaalMallik @Its_Badshah @indiatvnews pic.twitter.com/XC04ZkKe0m
— Manish Prasad (@manishindiatv) November 11, 2022
याआधी देखील जवानांचे अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परंतु हा व्हिडीओ खूपच खास आहे. जवान यावेळी निसर्गासह थंडीचा आणि गाण्याचा पुरेपूर आनंद घेताना स्पष्ट दिसत आहेत. जवानांचा हा व्हिडीओ अनेक भारतीय सेलिब्रेटींनी देखील शेअर केला आहे.