पिंपरी – बनावट चावीच्या सहाय्याने दोन वेगवेगळी एटीएम मशीन उघडून त्यातून एक लाखांचे सीपीयू आणि एस अँड जी कंपनीचे लॉक चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. 24) सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास माऊलीनगर, दिघी आणि वडमुखवाडी चऱ्होली येथे घडली.
सचिन शिवकीरण काळगे (वय 32, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी काळगे हे इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस या कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील 150 एटीएमची देखभाल करण्याचे काम आहे. गुरुवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला.
बनावट चावीच्या सहाय्याने चोरट्यांनी सीपीयू आणि एस अँड जी कंपनीचे लॉक असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.