सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबी याचा तपास करत आहे. यानंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींची नावे घेण्यात आली आहेत. या प्रकरणात दीपिका पदुकोणचेही नाव समोर आले आहे. ड्रग प्रकरणात दीपिका पदुकोणचे नाव समोर येताच दीपिकासह तिचा नवरा आणि अभिनेता रणवीर सिंहला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
काही युझरने रणवीर सिंहच्या ड्रेसिंग स्टाईलवर प्रश्न उपस्थित केले. तर काही जणांनी दीपिकाच्या डिप्रेशनबाबतच्या वक्तव्यावर चुटकी घेतली आहे. बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर रणवीरचे फोटो शेअर केले आहेत, त्यात तो अंतरंगी अंदाजात दिसत आहे.
यातून तोही ड्रग्ज घेत असल्याचे अप्रत्यक्षपणे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, दीपिकालाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. यामुळे बॉलीवूडमधील या स्टार कपलविरोधात सध्या प्रेक्षकांमध्ये रोष असल्याचे दिसून येत आहे.