बिबवेवाडीत धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून

पुणे(प्रतिनिधी) – सुरक्षा रक्षकाचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी त्याच्या सख्ख्या भावास अटक केली. पूर्वीच्या भांडणातून सख्ख्या धाकट्या भावानेच दांडक्‍याने मारहाण करीत त्याचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गंगाधाम चौक परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. 

सुरेश खाजप्पा खानेकर (32, रा. प्रेमनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कविता बेरवा (28, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रकाश खानेकर (40, रा. बिबवेवाडी) याचा कपाळावर तसेच चेहऱ्यावर दांडक्‍याने मारहाण करून खून केला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनास्थळावर उपस्थित असलेल्या त्याच्या भावावर पोलिसांना संशय आला होता. सुरेश हा प्रकाश याचा भाऊ आहे. त्यांच्यात कौटुंबिक करणातून सातत्याने जोरदार भांडणे होत असत. त्यात ते एकमेकांना बेदम मारहाण करायचे. खुन होण्याच्या आठ दिवसांपूर्वी त्यांचे भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून शनिवारी सुरेश याने प्रकाशला मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश खानेकर याचा खुन झाल्यानंतर पत्ते खेळण्याच्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्‍त केला होता. मात्र, तपासात भावाने खून केल्याचे निदर्शनास आले. बिबवेवाडी पोलिसांनी सुरेशला अटक केली आहे. तो बिगारी काम करतो. तसेच, प्रेमनगर भागत राहावयास आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.