बेल्हे -निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील एका 65 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेने बेल्हे येथील एका खासगी दवाखान्यात तीन दिवस उपचार घेतले. यानंतर या महिला पुढील उपचारासाठी मंचर येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. या महिलेचा मंचर येथील कोविड सेंटरमध्ये शनिवारी (दि. 25) उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या महिलेचा रविवारी (दि.26) रिपोर्ट आला असून ती महिला पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण्ण झालं आहे. या महिलेवर अंत्यसंस्कार करताना प्रशासनाने खबरदारी घेतली होती, अशी माहिती तालुक्याचे आरोग्य अधिकारी उमेश गोडे व निमगाव सावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक संभाजी गोडे यांनी दिली. यामुळे निमगाव सावा तील एकूण रुग्णसंख्या 3 झाली आहे. दरम्यान, तालुक्यात बाधित वाढत असल्यामुळे नागरिकांमधून घबराट पसरली आहे. प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत.