जनसंघ संस्थापकांना पश्‍चिम बंगाल सरकार करणार अभिवादन

कोलकाता – भारतीय जनसंघाचे संस्थापक शामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमीत्त रविवारी पाश्‍चिम बंगाल मधील तृणमुल कॉंग्रेसचे सरकार त्यांना अभिवादन करणार आहे. मागच्यावर्षींही पश्‍चिम बंगाल सरकारने त्यांना पुण्यतिथि निमीत्त अभिवादन केले होते.

उद्या रविवारी राज्याचे उर्जा मंत्री सोवनदेब चट्टोपाध्याय हे कोलकात्यातील केओराताला भागात उभारण्यात आलेल्या मुखर्जींच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करणार आहेत. रविवारी त्यांची 65 वी पुण्यतिथी आहे. डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सन 2018 मध्ये मुखर्जी यांच्या पुतळ्याची मोडतोड केली होती पण तृणमुल कॉंग्रेसच्या सरकारने तेथेच शामा प्रसाद मुखर्जी यांचा नवीन पुतळा त्या ठिकाणी बसवला आहे.

हा पुतळा ब्रॉन्झ धातूत करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याचवेळी डाव्या पक्षांच्या चारजणांना अटक करण्यात आली होती. मुखर्जी हे प्रखर देशभक्त आणि दूरदृष्टीचे नेते आहेत अशा शब्दात पश्‍चिम बंगाल सरकारने त्यांचा गौरव केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.