#CWC19 : खराब फलंदाजीमुळेच आमचा पराभव- बटलर

लीड्‌स – विजयासाठी 233 धावांचे लक्ष्य अवघड नव्हते. मात्र आमच्या खेळाडूंनी खराब खेळ करीत स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. हेच आमच्या पराभवाचे मुख्य कारण आहे असे इंग्लंडचा यष्टीरक्षक व फलंदाज जोस बटलर याने सांगितले.

इंग्लंडला श्रीलंकेकडून 20 धावांनी पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत त्यांचा हा दुसरा पराभव आहे. बटलर याने सांगितले की, एवढी निराशाजनक कामगिरी आमच्याकडून अलीकडच्या काळात झालेली नाही. खेळपट्टी फलंदाजीस पोषकच होती. त्यावर टिच्चून खेळ केला असता तर 233 धावा सहज निघाल्या असत्या.

जेसन रॉय याची अनुपस्थिती हे काही पराभवाचे कारण सांगता येणार नाही. संघातील अन्य फलंदाजांमध्ये हे आव्हान पार करण्याची क्षमता होती. लसिथ मलिंगा याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याने अचूक गोलंदाजी कशी करतात याचा प्रत्यय घडविला. अजूनही आम्हाला उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याची संधी आहे. उर्वरित सामन्यांमध्ये आम्ही सर्वोत्तमच कामगिरी करू असा मला विश्‍वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.