वेटरचा सल्ला ठरला सचिनसाठी मोलाचा

नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला फलंदाजीसाठी चक्क एका हॉटेल कर्मचारी असलेल्या वेटरने दिलेला सल्ला मोलाचा ठरला असे सांगितले तर कोणी विश्‍वास ठेवेल का, पण हे खरे आहे. चेन्नईतील ताज कोरोमंडल हॉटेलमधील एक वेटर गुरु प्रसाद याने सचिनची भेट घेतली होती, त्या घटनेची आठवण सचिनने सांगितली. सचिनचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही वर्षांपूर्वी चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गुरुप्रसादसोबत झालेल्या भेटीचा उल्लेख सचिनने केला आहे. या वेटरला शोधण्यासाठी सचिनने लोकांची मदत मागितली होती. वेटरशी झालेल्या भेटीत एक सल्ला सचिनला मिळाला होता. त्यानंतर फलंदाजीच्या शैलीत झाला होता. व्हिडिओ आणि ट्‌विट करून सोशल मीडियावर केलेल्या सचिनच्या आवाहनानंतर एका वृत्त वाहिनीने या वेटरला शोधले.

19 वर्षांपूर्वीची ही आठवण सचिनने पुन्हा काढली. सचिन वापरत असलेल्या आर्म गार्डच्या रिडिझाइनबद्दल सल्ला दिला होता आणि सचिननेही त्यानंतर आर्म गार्ड रिडिझाईन केले होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत सचिनची खेळण्याच्या शैलीत थोडा बदल झाला होता.

एका कसोटी मालिकेवेळी चेन्नईतील ताज कोरोमंडल हॉटेलमधील एक वेटर भेटला होता. त्यावेळी आर्म गार्डबद्दल त्याच्याशी चर्चा झाली होती. त्यात वेटरने आर्म गार्डचे डिझाईन बदलण्याचा सल्ला दिला होता. तुम्ही आर्म गार्ड घालून खेळता तेव्हा बॅट स्विंग होण्याची शैली वेगळी असते. वेटरने सांगितलेली गोष्ट मलाही माहिती होती पण ती कोणालाही बोललो नव्हतो. त्या वेटरला सांगितले की, हाच गुरुप्रसाद एकटाच असा व्यक्ती आहे की ज्याने माझ्या फलंदाजीचे इतके बारकाईने निरीक्षण केले. यानंतर मी आर्म गार्डला रिडिझाइन केले, असेही सचिन म्हणाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)