#CWCLeague2 : संयुक्त अरब अमीरातचा स्काॅटलंडवर विजय

दुबई : चिराग सूरी आणि बासील हमीदच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संयुक्त अरब अमीरातने आयसीसी सीडब्ल्यूसी लीग-२ मधील सहाव्या एकदिवसीय सामन्यात स्काॅटलंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. संयुक्त अरब आमीरातचा फलंदाज बासील हमीद सामन्याचा मानकरी ठरला.

विजयासाठीचे २२१ धावांचे आव्हान संयुक्त अरब अमीरातने ४३.५ षटकांत ३ बाद २२४ धावा करत पूर्ण केले. संयुक्त अरब अमिरातकडून सलामीवीर चिराग सूरीने सर्वाधिक ६७ धावा केल्या. बासील हमीदने नाबाद ६२ तर मुहम्मद उस्मानने नाबाद ३६ धावांची खेळी करत संघास विजय मिळवून दिला. स्काॅटलंडकडून स्टुअर्ट व्हिटिंघम, हमजा ताहिर आणि डायलन बुज यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, संयुक्त अरब अमीरातने नाणेफेक जिंकून स्काॅटंलंडला प्रथम फलंदाजीस पाचरण केलं होते. त्यानंतर स्काॅटलंडने फलंदाजी करताना सलामीवीर काइल कोएटजरच्या ९५ आणि मैथ्यू क्राॅसच्या ५३ धावांच्या खेळीच्या जोरावर ४८.३ षटकांत सर्वबाद २२० धावा केल्या होत्या. या दोघाव्यतिरिक्त इतर फलंदाज अपेक्षित फलंदाजी करू शकले नाही. संयुक्त अरब अमिरातकडून गोलंदाजीत जुनैद सिद्दीकी आणि रोहन मुस्तफा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर, पलानीपन मयप्पनने २ आणि अहमद रजाने १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.