दीड वर्षांमध्ये एकही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होवू शकलेला नाही. या काळात अनेक निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले आहेत.
रोहित शेट्टीच्या आगामी “सूर्यवंशी’ या चित्रपटाचे चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. मागे लॉकडाऊन शिथिल झाल्याने हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये लवकरच प्रदर्शित होईल, असे बोलले जात होते. पण तितक्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा परिस्थिती नाजूक बनली.
यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन अजून लांबणीवर पडले. आता 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनादिवशी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. रोहित शेट्टीने पोलीस युनिव्हर्स नावाची एक कन्सेप्ट बॉलीवूडमध्ये आणली आहे.
त्याने बनवलेले जास्तीत जास्त पिक्चर हे पोलीस आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित असतात. याआधी त्याने सिंघम, सिम्बा असे पोलिसांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवले होते. हे दोन्ही चित्रपट सुपर हिट ठरले होते.
आताचा “सूर्यवंशी’ देखील त्याच धाटणीचा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंह, कॅटरिना कैफ, अजय देवगण, अक्षय कुमार असे बॉलिवूडमधील स्टार्स दिसणार आहेत.
दरम्यान, रोहितला एक महिला पोलिस इन्स्पेक्टरची कथा प्रेक्षकांसमोर आणायची आहे आणि तो त्या स्क्रिप्टवर काम देखील करत आहेत. रोहित शेट्टी यांच्या आगामी चित्रपटत लेडी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसेल, हे पाहणे खूपच उत्साहाचे आहे.