मुंबई – बिग बॉसचे 17 वे पर्व (Bigg Boss17) लवकरच सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून या नव्या पर्वाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांच्या ही प्रतिक्षा संपणार आहे. ‘कलर्स टीव्ही’ने तीन नवे प्रोमो जारी करत बिग बॉसचे 17 वे पर्व कधीपासून सुरू होणार हे जाहिर केले आहे. यंदाचाही सीझन अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्या स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी सलमान सज्ज होणार आहे.
‘बिग बॉस सीझन 17 ’च्या तिन्ही नव्या प्रोमोमध्ये होस्ट सलमान खान वेगवेगळ्या रुपात पाहायला मिळत आहेत. एका प्रोमोमध्ये बॉम्बशोधकाच्या रुपात, तर दुसऱ्या प्रोमो गुप्तहेराच्या रुपात दिसत आहे. तसेच तिसऱ्या प्रोमोमध्ये तो कव्वाली गायकाच्या रुपात पाहायला मिळत आहे.
या प्रोमोद्वारे ‘बिग बॉस सीझन 17’ येत्या 15 ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवारी आणि रविवारी 9 वाजता प्रसारित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओ सिनेमा’वर 24 तास लाइव्ह देखील पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बिग बॉस 17 ची ‘थीम दिल दिमाग और दम’ असणार आहे. यंदाच्या बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, हर्ष बेनिवाल, मुनव्वर फारुकी, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिका यासारखे कलाकार असणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र बिग बॉसच्या या 17 व्या सीझनमध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार हे शो सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.