इतर देशांना अमेरिका देणार आणखीन ‘इतके’ कोटी डोस

वॉशिंग्टन – करोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी अमेरिका इतर देशांना करोना विरोधी लसींचे आणखीन 50 कोटी डोस देणार आहे. अध्यक्ष ज्यो बोयडेन याबाबतची घोषणा करणार आहेत. यापूर्वी बायडेन यांनी जगातील गरजवंत देशांसाठी करोना लसींचे तितकेच डोस देण्याची घोषणा केली होती.

आता अमेरिकेकडून जगभरातील देशांना देण्यात येणाऱ्या डोसची एकूण संख्या 1.1 अब्ज इतकी झाली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सध्या सुरू असलेल्या आमसभेमध्येच बायडेन याबाबतची घोषणा करणार आहेत. याशिवाय प्रत्येक देशामध्ये सप्टेंबर 2022 पर्यंत किमान 70 टक्के लसीकरण करण्याचे आव्हान स्वीकारण्याचे आवाहनही ते जगभरातील देशांना करणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमेरिकेत आतापर्यंत दिल्या गेलेल्या लसीच्या प्रत्येक डोसमागे 3 डोस अन्य देशांना देण्यात येणार आहे, असेही अमेरिकेच्या अधिकारी महिलेने सांगितले.

अमेरिकेने आतापर्यंत अन्य देशांसाठी 16 कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत, असे बायडेन यांनी काल संयुक्त राष्ट्रातील भाषणादरम्यान सांगितले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.