पुणे – पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड) प्रकरण मंजूर करण्यासाठी शेतकर्याकडे पाच हजारांची लाच मागणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेच्या विकास अधिकार्याला व बोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सचिव या दोघांना पाच हजारांची लाच घेताना अटक केली. दीपक रामचंद्र सायकर (38) आणि गोपीचंद दत्तात्रय इंगळे (27) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत एका 33 वर्षीय तरूणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.