पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पांचा फेर आढावा घेण्याचे काम महामेट्रोने सुरू केले आहे.
पीएमआरडीएने सुमारे ७ हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा २०१८ मध्ये ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’तयार करण्याचे काम एल अॅंड टी कंपनीला दिले आहेत. या कंपनीने प्राधिकरणास सादर केलेल्या अहवालात मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, रिंगरेल आणि बीआरटी, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, नवीन बस डेपो, रेल्वे स्टेशनचे अद्यायवतीकरण, नवीन रस्ते विकसित करणे या मोठ्या प्रकल्पांसह प्रमुख चौकांचे रुंदीकरण असा सुमारे ५४ हजार ६०१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस केली आहे. त्याच बरोबरच दर पाच वर्षांनी या आराखड्याचे पुनर्विलोकन करावे, अशी शिफारस केली होती.
संबंधित कंपनीकडून पाच वर्षांपूर्वी अहवालात प्रस्तावित करण्यात आलेले प्रकल्पांचे फेरविचार, सद्यःस्थिती आणि नव्याने हाती घ्यावयाचे प्रकल्प, निधीचे नवीन पर्याय यावर अभ्यास करून आराखड्यात काही बदल सुचविणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.