टोकियो – करोनाच्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे गेली असली तरी आता बदललेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा व्हावी, असे मत टोकियोच्या राज्यपाल युरिको कोईक यांनी व्यक्त केले आहे.
या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यापासून देशात नूतनीकरण तसेच विकासकामे सुरू करण्यात आली. त्यावर प्रचंड खर्चही करण्यात आला. आता जर ही स्पर्धा रद्द करण्याची मानसिकता दूर करून स्पर्धेच्या आयोजनाबाबत गंभीर राहिले पाहिजे. प्रायोजकांशी बैठका घेऊन त्यांनाही आश्वस्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. करोनावर आपण मात केली असे सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा होणे जागतिक क्रीडा क्षेत्रासाठी मोठे पाऊल ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
करोनाचा धोका कायम असला तरीही येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये करोनाचा नायनाट करू. त्यामुळे आता हतबलता दूर करून स्पर्धेसाठी संपूर्ण जगाने एकत्र येणे आवश्यक आहे. ही स्पर्धा झाली तरच क्रीडाक्षेत्राला चालना मिळेल. प्रायोजकदेखील आपले सहकार्य कायम ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.