पुणे – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या दहीहंडी महोत्सवाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, अभिनेते प्रवीण तरडे, ईशान्य महेश्वरी, क्रिकेटपटू केदार जाधव, डीजे तपेश्वरी, डीजे अखिल तालरेजा ही कलावंत मंडळी उपस्थित राहणार आहेत.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्ट आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ यांनी एकत्र येत गतवर्षीपासून सार्वजनिक दहीहंडी महोत्सव सुरू केला आहे. लक्ष्मी रस्त्यावर गुरुजी तालीम गणपती चौकात ही दहीहंडी कार्यक्रम होतो. गतवर्षी झालेल्या पहिल्याच वर्षी तब्बल 50 हजार तरुणांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली गेली होती.
यावर्षी या मोहत्सवाचे दुसरे वर्ष आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जास्तीत जास्त युवकांनी या उत्सवासाठी उपस्थितीत राहावे, असे आवाहन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी केले आहे.