गेल्या काही महिन्यांमध्ये मानुषी छिल्लरच्या करिअरमध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत. अक्षय कुमारबरोबरचा तिचा पहिला सिनेमा “पृथ्वीराज’ अजून रिलीज व्हायचा आहे. कोविड-19 च्या साथीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
यादरम्यान तिने विजयकृष्ण आचार्यच्या बॅनरचा आणखीन एक सिनेमा स्वीकारला आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असून, त्यामध्ये तिच्याबरोबर विकी कौशल असणार आहे. आता अशी बातमी समजते आहे की, मानुषीने तिसरा सिनेमा स्वीकारला आहे.
हा तर थेट आदित्य चोप्राच्या कंपनीचा म्हणजे यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनणारा सिनेमा असणार आहे. आदित्य चोप्राने तर मानुषी छिल्लरला शिव रावेलच्या सुपरहिरोच्या प्रोजेक्टमध्ये घ्यायचे ठरवले आहे.
यामध्ये मानुषी चक्क लीड रोल साकारणार आहे. तिच्यासमवेत नवोदित आहन पांडे असणार आहे. यशराज फिल्मसाठीचा मानुषीचा हा तिसरा सिनेमा असणार आहे. मात्र, यशराज फिल्म्स तिच्याकडून आणखीन काम करवून घेण्याचा विचार करत असणार हे नक्की.
विकी कौशलबरोबरच्या कॉमेडी सिनेमाचे बहुतेक शूटिंग आता पूर्ण होत आले आहे, तर “पृथ्वीराज’चेही बहुतेक काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आपल्या तिसऱ्या सिनेमाचे काम मानुषी यावर्षी कधीही सुरू करू शकते.