#BabaKaDhaba चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात दाखल

मुंबई – गेल्या 1 वर्षात ‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या कांता प्रसाद खूप चर्चेत आले होते. सोशल मीडियाच्या मदतीने बाबा रातोरात लक्षाधीश झाले आणि त्यांचा रस्त्यावरचा ‘बाबा का धाबा’ रेस्टॉरंटमध्ये शिफ्ट झाला.

पण लॉकडाऊनच्या फाटक्यामुळे आता बाब पुन्हा आपल्या रस्त्यावरच्या ढाब्यावर परत आले आहेत. मात्र लॉकडाऊनच्या फाटक्यामुळे  कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 

 

याबाबत वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कांता प्रसाद यांनी  भरपूर मद्यसेवन केले. दारूच्या नशेतच त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात, असा अंदाज आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

दरम्यान, बाबाने  नवीन  रेस्टॉरंटचा श्री गणेशा  दिल्लीच्या मालवीय नगर मध्ये केला होता.    मात्र, आता त्यांच्यावर व्यवसायाला पुन्हा एकदा लॉक डाउन  फटका बसला आहे. पुन्हा बाबा का ढाबा रेस्टॉरंट बंद करून जुन्याच जागेवर आले. सोशलवर पुन्हा एकदा त्याचे रेस्टॉरंट बंद पडल्याच्या पोस्ट व्हायरल झाली. 

 

व्हायरल पोस्ट नुसार गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांचे नवीन रेस्टॉरंट बंद झाले. आता ते पुन्हा जुन्या ढाब्यावर आले आहेत. याच ठिकाणहून त्यांच्या खाद्यपदार्थांना मोठी मागणी वाढली होती. मात्र, लॉकडाऊनने त्यांच्या खपामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे खर्च परवडत नसल्याने त्यांना हे रेस्टॉरंट बंद करावे लागल्याचे व्हायरल होत आहे. 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.