नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या मुंबईपासून दूर त्याच्या गावी म्हणजे उत्तराखंडमधील बुधानामध्ये आहे. इतक्यात तरी काम पुन्हा सुरू करण्याचा आपला काहीही विचार नसल्याचे त्याने म्हटले आहे.
मुंबईतील लॉकडाऊन आता शिथिल केले गेले आहे. शूटिंगदेखील पुन्हा सुरू होत आहेत, हे त्याला माहिती आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शूटिंला परवानगी दिली गेली आहे.
मात्र, तरीही तो इतक्यात मुंबईमध्ये परत येणार नाही. कामाला पुन्हा सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे की नाही, हे सांगता येणार नाही.
ज्या गोष्टी मुंबईमध्ये करता येऊ शकत नाहीत, त्या स्वतःच्या शेतात काम करण्यासारख्या गोष्टी आपण सध्या उत्तराखंडमध्ये करत असल्याचे त्याने म्हटले आहेत. जोपर्यंत आपल्या मनाला वाटत नाही तोपर्यंत मुंबईत परत येणार नाही.
सध्या त्याच्याकडे “बोले चुडिया’ हा महत्त्वाचा सिनेमा आहे. नवाजुद्दीनचा भाऊच याचे दिग्दर्शन करतो आहे. गेल्या वर्षभराच्या काळात त्याने “संगीन’ आणि “जोगिरा सा रा रा’ या
दोन सिनेमांचे काम पूर्ण केले आहे. याशिवाय त्याने काही जाहिरातींचे कामही पूर्ण केले आहे. आता इतक्यात तरी काही काम करण्याची त्याची तयारी नाही.