बीजिंग – अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर येणारे नवीन तालिबान सरकार दहशतवादी संघटनांबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकेल, अशी आशा चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग वी यांनी व्यक्त केली आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री हसन आमिर अब्दुल्ला यांच्याबरोबर झालेल्या दूरध्वनी संभाषणाच्यावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर चीनने “ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’ या दहशतवादी संघटनेला तालिबानकडून बळ मिळण्याची चिंता व्यक्त केली होती. तसेच चीनमधील शिंझियांग प्रांतातील इस्लामी कट्टरवाद्यांच्या कारवाया वाढण्याची शक्यताही व्यक्त केली होती.
“इटीआयएस’ ही दहशतवादी संघटना शिन्झियांग प्रांतातील उघ्युर मुस्लिमांमध्ये सक्रिय आहे. शिन्झियांग प्रांताला पूर्व तुर्कीस्तान म्हणून स्वतंत्र देश म्हणून फुटून वेगळे करण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील आहे. “इटीआयएम’ या संघटनेला तालिबानकडून कोणतेही सहकार्य मिळू नये असे आश्वासन चीनने यापूर्वीच तालिबानकडून मिळवले आहे.
तालिबानचा प्रमुख मुल्ला अब्दुल घनी बरोदर हा तियान्जिनमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटला होता, तेंव्हाही याच विषयावर चर्चा झाली होती.