इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूरकर गेली वर्षभर जो संघर्ष करीत आहेत तो संघर्ष वाया जाऊन दिला जाणार नाही, असे आश्वासन बारामती हायटेक टेक्सस्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे व माजी नगराध्यक्ष अलकाताई ताटे यांच्या निवासस्थानी इंदापूरकर नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी इंदापूरकरांशी त्या बोलत होत्या.
ताटे सर आणि त्यांचे सहकारी यांची इंदापूरकरांच्या प्रश्नांबद्दल असलेली तळमळ व ते ज्या विश्वासाच्या भावनेने पोटतिडकीने प्रश्न मांडत आहेत. त्यावरून इंदापूरकरांचे प्रश्न गंभीर आहेत. हे प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादांना यासंबंधी माहिती देऊन त्यांचे सहाय्याने हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ताटे परिवार व संघर्ष समिती यांनी केलेल्या स्वागत सत्कार बद्दल धन्यवाद दिले.
घरपट्टीवर जो 24 टक्के व्याजाचा बोजा आहे तो जास्तीचा आहे. करोना काळामध्ये घरपट्टी, गाळे भाडे व इतर बाबतीत अनेक ठिकाणी सवलती मिळाल्या असताना व मग इंदापूरमध्येच या सवलती का मिळत नाहीत.
इंदापूरमध्ये तरंगवाडी तलावावरील बंद केलेल्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न उजनीचे अशुद्ध पाणी यामुळे शहरातील नागरिकांना होणारे आजार गरिबांच्या घर जागेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बांधलेला घनकचरा डेपो व संघर्ष समितीचे 27 प्रश्न यासंबंधी मी माहिती घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करेन, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सारिकाताई भरणे होत्या. यावेळी हमीद आत्तार, माजी नगरसेवक हाजी सलीमभाई बागवान, माजी नगराध्यक्ष अलका ताटे, संतोष जामदार, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेश राऊत, वारकरी संप्रदायाचे दत्तू अण्णा पवार, दीपक ताटे, संघर्ष योद्धे रघुनाथ खरवडे, अर्जुन शिंदे, अशोक ननवरे, मुख्याध्यापक दिलीप पाडूळे,
निवास घोलप, विजय शिंदे, विजय सुळके, जाकिर मोमीन, आगंद गाडेकर, छात्र भारतीचे किरण कडवळे, अजित बागवान, राजू ताटे, आकाश गावडे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. सुनेत्राताई पवार यांच्या बरोबर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे महिला शहर अध्यक्ष उमाताई इंगोले उपस्थित होत्या.