पालखीच्या वाटेवरील स्मार्ट व्हिलेज ‘मांडवे’

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात महादेव डोंगररांगांच्या पायथ्याला वसलेलेल्या मांडवे गावाला भेट दिली.

या गावाला राज्य सरकारचा स्मार्ट व्हिलेज अंतर्गत पुरस्कार मिळाला आहे. तसेच यापूर्वी या गावाला तंटामुक्त गाव म्हणून सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. 17 सदस्यांची या गावाची ग्रामपंचायतीची बॉडी आहे. 18 पगड जाती असलेले या गावात सर्वजण एकोप्याने राहतात.

100 टक्के हागणदारी मुक्त, स्वच्छतेवर विशेष भर. तसेच या गावातील नागरिकांचा वृक्ष लागवडीवर भर आहे.

गावात असलेल्या नैसर्गिक सौंदर्य व विपुल पाणीसाठा यामुळे गावाला जिल्ह्यामध्ये विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मांडवे गावाची सर्वसामान्य माहिती नागरिकांकडून जाणून घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.