अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त पंधरा दिवस कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

महादेव अर्जून कांबळे (वय 23, रा. गोकुळनगर, कात्रज) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. कांबळे हा पीडितेच्या तोंड ओऴखीचा होता. त्याने 5 ऑगस्ट 2014 रोजी कांबळे याने पीडितेला बाहेरगावी नेले. तेथे लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणाचा तपास करून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी या प्रकरणात काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामकाजासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संजय जाधव यांनी मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.