नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेले व्यक्तीगत निर्जंतुकीकरणण केंद्र ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने (एम्स) बंद केले आहे. त्याच्या उपयुक्ततेचा कोणताही पुरावा मिळाला नसल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले.
रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाबाहेर चार दिवसापुर्वी हे केंद्र सुरू करण्यात आले होते. हे केंद्र तसेच ठेवण्यात आले आहे. मात्र त्याचा वापर थांबवण्यात आला आहे. निर्जंतकीकरणासाठी अंगावर फवारला जाणारा सोडीयम हायपोक्लोराईड हे संसर्गहीन करण्यास पुरेसे नाही आणि त्यामुळे अंगाला खाज सुटते, असे निदर्शनास आले आहे, असे एम्सचे वैद्यकीय अधिष्टाता डॉ. डी. के. शर्मा यांनी सांगितले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी करोना नसणाऱ्यांची काळजी घेताना शिंक आल्यास खांद्याजवळ नाक नेऊन शिंकावे. तसेच करोना बाधितांची तपासणी करताना, मास्क, ग्लोव्हज यांसह पीपीई किटचा वापर यापेक्षा अधिक सुरक्षित आहे, असे त्यांनी सुचवले.