स्टॉल धारकाला अतिक्रमण विभागाचा अन्याय झाला नाही सहन; मग त्याने असे काही केले की झाला गुन्हा दाखल

पुणे – स्टॉल धारकाने ‘गरीबावर अन्याय करता, हप्ते घेता अन कष्टकरून खाणाऱ्यांना त्रास’ देता म्हणत अतिक्रमण कारवाईदरम्यान आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळानिर्माण केला आहे. मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी आकाश भगवान दुधाळे (24 ), साहील अनिल शेलार (18 ) यांना अटक केली आहे. तर, दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मेद्या राऊत (33 , रा. घोरपडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या महापालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक म्हणून नोकरीस आहेत.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात त्यांची नेमणूक आहे. त्या शुक्रवारी सकाळी शिवनेरी रोडवरील अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आकाश याने कर्मचाऱ्याला तुला बघून घेतो, अशी धमकी देत तक्रारदार यांना तुम्ही गरीबावर अन्याय करता, हप्ते घेता अन कष्टकरून खाणाऱ्यांना त्रास असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच, त्या करत असलेल्या सरकारी कामात अडथळानिर्माण केला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक डाबेराव हे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.