पुणे – वारज्यात पाच जणांच्या टोळक्याने हातात तलवारी व लोखंडी रॉड घेऊन मोठा राडा घातला. यात एकाच्या घराची तसेच तेथील वाहनाची तोडफोड केली आहे. याप्रकरणी विठ्ठल कुरपे (47 , रा. कर्वेनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सचिन बबन शिंदे (32 ), नितीन नारायण जमादार (32 ), अमित छोटेलाल प्रसाद (32 ) व रोहित राजेंद्र काळे (27 ) यांना अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या शेजारी ट्रिक शॉट दुकान आहे. तेथे त्यांना बोलवून घेतले. तसेच, त्यांची यातील दोन आरोपींशी ओळखकरून दिली. यावेळी त्यांनी माझी कशाला ओळखकरून देता, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने आरोपींनी राडा घालत तक्रारदारांना मारण्याची धमकी देत गोंधळ घातला.