पुणे : शहरातील सर्वात मोठी आणि दाट लोकवस्ती असलेल्या जनता वसाहत मध्ये करोनाचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. मागील 6 दिवसात या भागातील रुग्णाची संख्या 45 वर गेली. गुरुवारी या भागातील एकाच कुटुंबातील दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
16 मे पर्यत या वसाहती मध्ये एकही करोनाबाधित नव्हता. या भागातील नागरिकांनी स्वयंशिस्तीने करोनाला अटकाव घातला होता.
मात्र, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली व्यक्ती बाधित झाली होती. त्यानंतर या ठिकाणी रुग्णाचा आकडा वाढतच असून शुक्रवारी तो 45 वर गेला असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.