Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींचा बहुचर्चित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या 19 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं आहे. काही दिवसांपू्र्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सध्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा 3 मिनिटं 38 सेकंदाचा ट्रेलर प्रेक्षकांचं शेवटपर्यंत लक्ष वेधून घेतो. पंकज त्रिपाठींच्या अभिनयाचं सध्या सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. यामधील अनेक संवाद लक्षवेधी ठरत असून, अश्यातच सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटातील ‘राम धुन’ हे गाणे रिलीज झाले आहे, ज्याने रिलीज होताच सर्वांची मने जिंकली आहेत.
पंकज त्रिपाठी यांनी स्वतः या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यासोबत लिहिले आहे की, ‘जब धुनकी लगी राम नाम की, सारे काम विसरलो! # रामधुन गाणे आता रिलीज झाले आहे. #MainATALHoon 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भक्तीगीतांमध्ये तल्लीन झालेले कैलाश खेर यांनी आपल्या मधुर आवाजात हे गाणे गायले आहे. असं कॅप्शन अभिनेत्यानं दिलं आहे.
View this post on Instagram
काही तासांतच प्रदर्शित झालेल्या या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले असून, त्यात मोठी वाढ होत आहे. याशिवाय व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या गाण्याचे बोलही कैलाश खेर यांनी लिहिले आहेत. हे गाणे देखील कैलाश खेर यांनी संगीतबद्ध केले आहे, तर गाण्याचे संगीत फ्रँको भल्ला यांनी तयार केले आहे.