मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकत्याच पार पडलेल्या गुढी पाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना राम नवमी उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले होते. आज संपूर्ण देशभर राम नवमी मोठ्या आनंदात साजरी होत असताना राज ठाकरे मात्र सध्या विदेश दौऱ्यावर गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये मिटकरींनी राज ठाकरे विदेश दौऱ्यावर गेले असल्याचे म्हणत टोला लगावला आहे.
आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात,”रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात, “हंस चुगेगा दाना तिनका l कौआ मोती खायेगा ll”
यावेळी मिटकरींनी थेटपणे राज ठाकरेंचे नाव घेणे टाळले असले तरी त्यांनी हिंदुजननायक असा उल्लेख केल्याने हे ट्विट राज ठाकरेंसाठीच असल्याचे स्पष्ट झाले. आता मनसेककडून मिटकरींच्या या ट्विटला नेमकं काय उत्तर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदु जननायक” परदेश दौऱ्यावर पळाले.
त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे…
याला म्हणतात , “हंस चुगेगा दाना तिनका l
कौआ मोती खायेगा ll”— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 30, 2023
काय म्हणाले होते राज ठाकरे नेमकं
मनसेचा यंदाचा गुढी पाडवा मेळावा चांगलाच वादळी ठरला होता. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री शिंदेंनवर देखील टोलेबाजी केली होती. “राज्यकर्ते जेव्हा दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात, तेव्हा बाहेरचे लोक काय करतात? हे मी तुम्हाला माहीमचं अतिक्रमणावरून दाखवलं आहे माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे यंदा रामनवमी मोठ्या उत्सहात साजरी करा. सहा जूनला शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. मी रायगडावर जाणार आहे असं ठाकरे म्हणाले होते.