जामखेड -स्टेट ऑफ महाराष्ट्र ग्रीबिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम म्हणजेच (स्मार्ट) या प्रकल्पातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला विविध उद्योग व्यवसायांना उभारी मिळणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी प्रकल्पाच्या तसेच संबंधित सर्व अधिकारी वर्गाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. ही बैठक म्हणजे कर्जत-जामखेडच्या विकासात अधिकची भर घालणारी आहे. स्मार्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून कृषि विभाग, ग्रामविकास, पशुसंवर्धन, पणन, सहकार, महिला व बालकल्याण, नगरविकास आदी विभागाच्या यंत्रणा या प्रकल्पात समाविष्ट होत असुन येत्या जुन महिन्यात या प्रकल्पास सुरुवात होत आहे.
मतदारसंघात असणाऱ्या फार्मर प्रोड्यूसर कंपन्याना प्रोत्साहित करून त्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. मात्र या कंपन्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आणि या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या भागातील शेतकरी जे माल उत्पादित करतील. त्या मालाची प्रक्रिया करून त्या मालाची परदेशात किंवा पुणे-मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत विक्री करू शकतो. जे ने करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदला मिळेलच आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. या व्यवसायांसाठी शासनाकडून 60 टक्के अनुदान दिले जाते. शेळीपालनासारखे व्यवसायही उभे राहू शकतात.
महिला बचत गट, फार्मर प्रोड्यूसर कंपनी, कृषि सहकारी संस्था आदींचाही या प्रकल्पात समावेश करून घेता येऊ शकतो. समाविष्ट करण्यात येणाऱ्या संस्थांची निवड किंवा ऑनलाईन प्रक्रिया जी राबवणार आहोत. त्याची निविदा जुनमध्ये निघणार आहे.ज्या जुन्या फार्मर प्रोड्यूसर कंपन्या असतील. त्या आपला प्रकल्पाची नोंदणी करून घेऊ शकतात.आ. पवार यांच्या माध्यमातून प्रकल्प मंजुर करण्यासाठी बॅंकांना सांगून सहकार्य करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या मदतीने वर्ल्ड बॅंकेकडून अर्थसहाय्य होणार आहे. गट शेतीला चालना देण्यासाठी स्मार्ट प्रकल्प महत्वाचा आहे. पुढील पाच दिवसात हे निवेदन संपर्क कार्यालयात जमा केले तर पुढील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बैठकीत स्मार्ट प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ.संजय पांढरे, दशरथ तांभाळे, प्रदीप पाटील, जे.आर बुंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कर्जतचे कृषी अधिकारी दिपक सुपेकर, जामखेडचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आदी अधिकारी सहभागी झाले होते.