बारामती (प्रतिनिधी): शहरातील दूध संघ वसाहत येथील कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील १५ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच शहरातील इतर ३ जणांचे तपासणी अहवाल देखील निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली .
शहरातील दूध संघ वसाहत येथील 29 वर्षीय तरुणास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्या तरुणाचा दुसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे . पहिला अहवाल पॉझिटिव्ह आलेले त्याचे संपर्कातील पंधरा जणांची तपासणी करण्यात आली.
दुध संघ वसाहतची सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. नगर परिषद बारामती येथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी लाॅकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये.
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी
दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.