सासवड -सासवड नगर परिषदेमध्ये करोना या विषाणूसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक असलेले किराणा दुकान, फळे व भाजी दुकाने, मेडिकल व दवाखाने वैद्यकीय सेवा, दूध संकलन व विक्री हे वगळता सर्व प्रकारची दुकाने दुकाने बंद ठेवण्यात आलेले होते.
सासवड नगर परिषद हद्दीमध्ये एकही करोना रुग्ण नसल्यामुळे इतर सर्व दुकानांसाठी नगर परिषदेकडे सुयोग्य नियोजन करून शहरातील दुकाने अटी व शर्तीच्या अधीन राहून वेगवेगळ्या दिवशी उघडण्यात आलेली आहे.
लॉन्ड्रीची दुकाने लॉकडाऊन उठेपर्यंत फक्त रविवार आणि गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. दूध संकलन विक्रीची दुकाने दैनंदिन सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय सुद्धा प्रशासनाने घेतलेला आहे.