मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.
पण गेल्या महिन्याभरापासून या सिनेमावर बहिष्कार घाला अशी मोहिम चालवणारा एक वर्ग सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह झाला होता. पण बहिष्काराची भाषा करणाऱ्या या गॅंगला शाहरुख खाननं चांगलीच धोबीपछाड दिल्याचं प्रत्यक्ष सिनेमा प्रदर्शित झाल्यावर दिसून आलं आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले असून, सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
दरम्यान, सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थने आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘पठाण 2’ची घोषणा केली आहे. ‘पठाण’ सिनेमाच्या टीमने नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद झाला आहे. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण 2’ची घोषणा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही आणखी एक पर्वणी असेल. मात्र, आता ‘पठाण 2’ मध्ये काय पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘केजीएफ 2’, ‘बाहुबली 2’ प्रमाणे चाहते आता ‘पठाण 2’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.