मुंबई – सुपरस्टार सलमान खानच्या प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉसनंतर स्पर्धकांचे नशीब चमकताना दिसते आहे. याचे थेट उदाहरण बिग बॉस 13 ची स्पर्धक असलेली अभिनेत्री शहनाज गिलचे नाव घेता येईल. अशात आता बिग बॉस सीझन 16 ची स्पर्धक प्रियांका चहर चौधरी बद्दल मोठी बातमी येत आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की प्रियांका चहर चौधरी या वर्षी सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटात एंट्री करू शकते.
बॉलीवूड लाईफच्या वृत्तानुसार, बिग बॉस 16 ची स्पर्धक प्रियांका चहर चौधरी शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘डंकी’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी या चित्रपटासाठी पंजाबी मुलीच्या शोधात असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. याआधी सलमान खानने बिग बॉस 16 शोमध्ये सांगितले होते की, त्याच्याकडे प्रियांकासाठी खूप काही आहे.
अशात आता सलमानच्या सूचनेवरून प्रियंका चहर चौधरीला शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रियांका चंदिगडची असून ‘डंकी’ चित्रपटाची कथा कॅनडा आणि अमेरिकेत पंजाबी लोकांच्या अवैध स्थलांतराबद्दल सांगितली जात आहे. अशा परिस्थितीत प्रियांका चाहर चौधरी ‘डंकी’ चित्रपटात दिसण्याची शक्यता असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.