सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयावरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पुन्हा एकदा आरोप केले आहे. नारायण राणे या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामात खोड घालण्याचे काम करत आहे. असा आरोप राऊत यांनी केला आहे. आता यावर माध्यमांशी बोलतांना नारायण राणे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले,’ ‘खासदार विनायक राऊत यांना काही काम उरली नाही. सगळीकडे दलाली करत फिरत आहे, त्याला काहीही काम नाही ते पुढे म्हणाले, मला कधीच कुठल्याही कामात खोडा घालत नाही आणि मला सवयही नाही. मी कोणत्याही विकासाचे काम असेल, शैक्षणिक आरोग्याचे काम असेल मी असं काम करत नाही, मी कधीही खोडा घालणार नाही. वैद्यकीय महाविद्यालयाला काय गोष्टी लागतात आधी त्याची पुर्तता करा आणि मग बोला’असा टोला राणेंनी विनायक राऊत यांना लगावला.