सातारा, (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम बंद पाडणार्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, तो लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे. कारण या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे सातार्यातील शाळांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम होणार असून, अर्थकारणाला गती मिळणार आहे. मात्र, काही समाजकंटकांनी हे काम बंद पाडले आहे.
त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी लक्ष घालून, महाविद्यालयाचे बांधकाम कंत्राटदार आणि मजुरांना संरक्षण द्यावे. हा प्रकल्प कोणा एकट्याचा नसून, संपूर्ण जिल्ह्याचा आहे. तो वेळेत पूर्ण झाला पाहिजे. या महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेऊन बॅचेस बाहेर पडणार आहेत.
हे काम का बंद पडले, याची माहिती प्रशासनाने घ्यावी. हे काम सुरू झाले पाहिजे. तेथील व्हिडिओ फुटेज पाहून पोलिसांनी तपास करावा. संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा.